इस्रोच्या ‘बाहुबली’चे यश

 इस्रोच्या ‘बाहुबली’चे यश

बंगळुरु,दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज जगभरातील एक सर्वोत्तम उपग्रह प्रक्षेपण संस्था म्हणून नावाजली जात आहे. कमीत कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे विकसनशील देशांबरोबरच आता विकसित देश देखील उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोकडे येत आहेत. यातुन देशाला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. आपले तंत्रज्ञात अद्ययावत ठेवण्यासाठी सातत्याने कृतिशील असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता एक नवीन टप्पा पार पाडला आहे.

काल बाहुबली या अत्यंत शक्तिशाली अशा क्रायोजेनिक इंजिनाचे परीक्षण यशस्वी झाले आहे.बाहुबली इंजिनामुळे भारताच्या सर्वात वजनी रॉकेट LVM3 ची पेलोड क्षमता 450 किग्रॅ पर्यंत वाढली आहे.

इस्रोने नुकतेच LVM3 द्वारे 36 उपग्रहांना एकाच वेळी अंतराळाच्या कनिष्ठ कक्षेत प्रस्थापित करण्याचे विक्रमी कार्य पार पाडले होते. यासाठी वनबेव आणि इनस्पेस या संस्थांशी 1 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा करार करण्यात आला होता.

Isro Successfully Tested Heavy Cryogenic Engine To Enhance Lvm 3 Payload Capacity To 450 Kg

SL/KA/SL

11 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *