चांद्रयान-3 साठी ISRO सज्ज, या दिवशी प्रक्षेपणाची शक्यता

श्रीहरीकोटा, दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 ला महत्त्वाचा भाग रॉकेट लाँचरसोबत जोडण्यात आला आहे.’चांद्रयान-3 ची एन्कॅप्स्युलेटेड असेंबली बुधवारी, ( दि.5 जुलै) लाँच व्हेईकल (LVM3) शी जोडण्यात आलं आहे. लॉन्च व्हेईकल मार्क-III (LVM3) हे रॉकेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलं आहे.
इस्रो (ISRO) ने ट्विट करून माहिती दिली आहे की, चांद्रयान-3 श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये LVM3 रॉकेटशी जोडलं गेलं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण जुलै महिन्याच्या मध्यात होईल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे (ISRO) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, 13 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे.
चांद्रयान ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. याआधीच्या चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान 3 चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.
SL/KA/SL
6 July 2023