सूर्यांच्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी इस्रोने लाँच रॉकेट

 सूर्यांच्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी इस्रोने लाँच रॉकेट

श्रीहरीकोटा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने आज प्रोबा-3 मिशन लाँच केले. दुपारी 4:04 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पोलर सॅटेलाइट लाँच वेहिकल(PSLV) द्वारे या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात आले. हे मिशन युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) चे आहे. कोरोनग्राफ आणि ऑकल्टर या दोन उपग्रहांद्वारे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

बुधवारी संध्याकाळी 4:08 वाजता इस्रो या मोहिमेचे प्रक्षेपण करणार होते, परंतु तांत्रिक समस्येमुळे त्याचे प्रक्षेपण एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतील. पृथ्वीपासून त्यांचे कमाल अंतर 60,530 किमी आणि दुसरे किमान अंतर सुमारे 600 किमी असेल. या कक्षेत दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटर अंतर ठेवू शकतील आणि एका युनिटप्रमाणे काम करतील. ऑकल्टर उपग्रहामध्ये सूर्याच्या तेजस्वी डिस्कला ब्लॉक करण्यासाठी डिझाइन केलेली 1.4-मीटरची डिस्क आहे. यामुळे कृत्रिम सूर्यग्रहण होते. या सावलीत कोरोनाग्राफ उपग्रह आपल्या दुर्बिणीद्वारे सौर कोरोनचे निरीक्षण करेल.

सौर वादळ आणि कोरोनल मास इजेक्शनसह अवकाशातील हवामानाविषयीची आपली समज वाढवणे हे प्रोबा-3 चे प्राथमिक ध्येय आहे. या मोहिमेत, अंतराळ संस्थेला दोन उपग्रहांद्वारे त्याच्या एडवांस्ड फॉर्मेशन-फ्लाइंग टेक्नोलॉजीजचे प्रमाणीकरण करायचे आहे. प्रोबा-3 च्या माध्यमातून शास्त्रज्ञांना हे जाणून घ्यायचे आहे की, सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोन जास्त गरम का आहे आणि सौर वारा कसा तीव्र होतो.

प्रामुख्याने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी Proba-3 Mission लाँच करण्यात आले.सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात प्रोबा-3 मिशन हाती घेण्यात आले आहे. कोरोना हे सूर्याचे बाह्य वातावरण आहे. हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त गरम असतो. हे अंतराळ हवामानाचे स्त्रोत देखील आहे. प्रोबा-3 मिशनमध्ये दोन उपग्रह आहेत. एकाचे नाव कोरोनाग्राफ आहे. याचे वजन 310 किलो आहे. तर, दुसऱ्याचे नाव ऑकल्टर असे आहे. याचे वजन 240 किलो इतके आहे. हे दोन्ही उपग्रह मिळून एक अनोखा प्रयोग करणार आहेत. ऑकल्ट उपग्रह सूर्याच्या डिस्कला कव्हर करणार आहे. यामुळे कोरोनाग्राफ उपग्रह सूर्याच्या कोरोनाचे स्पष्टपणे निरीक्षण करून याचा डेटा गोळा करणार आहे. या तंत्रज्ञानामुळे सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यात मदत होणार आहे. दोन्ही उपग्रह एकमेकांच्या वर, एका निश्चित कक्षेत एकत्र ठेवलेले आहेत. या तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या प्रात्यक्षिक झाल्यास भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नवीन मार्ग पर्याय उपलब्ध होणार आहेत.

SL/ML//SL

5 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *