ISRO ने विकसित केली वीज कोसळण्याचा अंदाज वर्तवणारी सिस्टीम

बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ISRO आपत्ती व्यवस्थापनात सहाय्यभूत ठरणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. ISRO ने आता आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यात महत्वाचे यश मिळविले आहे. आता इनसॅट -3 डी उपग्रहाकडून मिळणाऱ्या डाटा मार्फत सुमारे 2.5 तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापासून दूरवर सुरक्षित जागेवर जाता येणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या विभागातील ही एक क्रांती मानली जात आहे.
आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशनमध्ये ( OLR ) इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र NRSC च्या संशोधकांनी इनसॅट – 3 डी उपग्रहाद्वारे मिळालेल्या ‘आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशन’OLR डाटामध्ये विशिष्ट संकेत पाहीले. त्यांना आढळले की OLR च्या तीव्रतेमध्ये त्यांना आढळले की ( OLR ) तीव्रतेत घट झाल्यामुळे वीज पडण्याची शक्यता असते. या निष्कर्षांवर आधारित, संशोधकांनी जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान (LST) आणि वाऱ्याचा वेग यासारखे अतिरिक्त मापदंड समाविष्ट केले. आणि एक संयुक्त मानक विकसित केले आहे. ते विजेच्या हालचालींमधील बदल प्रभावीपणे टिपते आणि अंदाज वर्तविते.
या नव्या सिस्टममुळे वीज कोसळण्याचा अंदाज सुमारे 2.5 तास आधी कळणार आहे. यामुळे भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्रात वीज कोसळण्याची शक्यता ही फार मोठी हानी असते. कारण देशात सर्वाधिक 27 टक्के मृत्यू वीज कोसळून भाजल्याने होतात. त्यामुळे जर वेळीत अलर्ट मिळाला तर शेतकरी आणि गावकऱ्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहचता येणार आहे.ज्यामुळे जिवीत आणि वित्तहानी टळणार आहे.
SL/ML/SL
2 April 2025