शेतीमध्ये पीक लागवड आणि कीड नियंत्रण यासाठी आता इस्रोकडून सहकार्य

 शेतीमध्ये पीक लागवड आणि कीड नियंत्रण यासाठी आता इस्रोकडून सहकार्य

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो द्वारे कृषी विभागासोबत सामंजस्य करार केले जात असून त्या माध्यमातून शेतीमध्ये पिकांची लागवड, कीड व्यवस्थापन याबाबत रिमोट सेन्सिंग अर्थात दूर संवेदन तंत्रज्ञानाद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरित केलं जात आहे.

 

यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई , पीक व्यवस्थापन तसेच इतर योजना यामध्ये लाभ होतो अशी माहिती इस्रोचे संचालक डॉ. एस सोमनाथ यांनी आज नागपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. नागपुरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एका सत्रात संबोधित करण्याकरता ते आज आले होते.

 

सत्राला संबोधित केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मिशनची घोषणा केली होती आणि २०२२ मध्ये ते साध्य करण्याचे तात्पुरते लक्ष्य होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. तथापि पहिले मानव रहित अंतराळयानाचे प्रक्षेपण २०२३ च्या शेवटी होईल अशी माहिती डाॅ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही डाॅ. एस. सोमनाथ यांनी सांगितले. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी पीएमओ संबंधित विभाग आणि मंत्रालयांशी सल्लामसलत करील असे सोमनाथ यांनी सांगितले.

 

चंद्रयान ३ मोहीमेची तयारी पूर्ण झाली असून सेफ लॅण्डींगवर आमचा भर राहणार आहे असेही सोमनाथ यांनी सांगितले. चांद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चांद्रयान १ आणि 2 नंतर इस्रो लवकरच चांद्रयान-३ लाँच करणार आहे. चांद्रयान-३ चे काम वेगाने सुरू आहे असेही सोमनाथ यांनी सांगितले. सोमनाथ म्हणाले की नवीन धोरणामध्ये अंतराळातील व्यावसायिक खासगी सहभागावर भर राहणार आहे.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन आणि विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रात खाजगी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रोचा प्रयत्न राहाणार आहे. अनेक भारतीय खाजगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. केंद्र सरकार यासाठी अनुकूल आहे.

 

खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याने भारतीय अंतराळ कार्यक्रम जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास सक्षम होईल आणि त्यामुळे अवकाश आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण होतील असे सोमनाथ यांनी सांगितले. बंगळुरू येथे इस्राेच्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. फक्त भूमि अधिग्रहण राहिले आहे. तेवढे झाले की लगेचच बांधकाम सुरू केले जाईल असे ते म्हणाले.

 

इस्रोचे द्वारा फ्युचर रॉकेट , फ्लेक्झिबल सॅटॅलाइट, स्पेक्ट्रम वितरण यासारख्या क्षेत्रावर सुद्धा संशोधन चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. अंतराळात वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह सोडल्यामुळे अंतराळात देखील स्पेस डेब्रीस-अंतराळ कचऱ्याची समस्या उद्भवली असून 80 टक्के सॅटेलाईट कार्यरत नसून यापैकी ते केव्हाही कोलाईड होऊ शकतात. यामुळे या सर्वांची माहिती घेऊन त्यांची नोंद घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

ML/KA/PGB

 

4 Jan 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *