सिंचन घोटाळ्याच्या फायली अरबी समुद्रात बुडविणार

 सिंचन घोटाळ्याच्या फायली अरबी समुद्रात बुडविणार


मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क):
सिंचन घोटाळा संदर्भात सबळ पुरावे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विध्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊ नही काहीच उपयोग न झाल्याने माझ्याकडे असलेले सिंचन घोटाळ्यातीळ कपाटभर कागदपत्रे अरबी समुद्रात बुडवणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्यात नेमकं चाललय तरी काय? ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते.ज्यांची ईडी, सीबीआय मार्फत चौकशी सुरू होती अशी लोकच सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसली असून मंत्री म्हणून शपथही घेतात. या नऊ मंत्रांपैकी सात मंत्र्यांवर भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू आहे. अशा आमदारांना भारतीय जनता पार्टीने सत्तेत सामावून घेतले.ही मोठी शोकांतिका आहे. हा सर्वात मोठा पैशांचा खेळ आहे. यांनी विचारधारा शिल्लक राहिली नसून किळसवाना प्रकार सुरु आहे.सर्वसामान्य लोकांनी राजकारण्यांकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवाव्यात हा प्रश्न पुढे उभा राहिला आहे. असे म्हणत दमानिया यांनी या सगळ्या गलिच्छ राजकारणाला संपवायला हवे असे म्हणत चांगला समाज घडवायचा असेल तर सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून लढा उभारला पाहिजे असे मत ही दमानिया यांनी व्यक्त केले.

सध्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय तेच कळायला काहीच मार्ग नाही ? कोण कोणत्या पक्षात कधी उडी मारेल याचा काही नेम नाही. राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवरती आलेले असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर पहायला सरकारला वेळ नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे ध्येयधोरण आणि एक वैचारिक पार्श्वभूमी असते. त्या नुसारच पक्ष चालवला जातो पण आज सर्वत्र गलिच्छ राजकारण सुरु असून या गलिच्छपणा विरोधात राजकारण्यांच्या या राजकारणात विरोधात जनतेवर रस्त्यावर उतरायला पाहिजे. एक जन आक्रोश उभारून लढा देण्याची गरज आहे असे संतप्त उदगार सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आक्रोश व्यक्त करीत मुंबईत काढले.यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले की ज्या राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी इंडिया अगेन्स्ट करप्शन च्या माध्यमातून मोहीम उभी केली होती अशा लोकांना न्यायालयातून शिक्षा होणे राहिले बाजूला आज तेच मंत्रीपदाची शपथ घेत होते.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांच्या विरोधात कोर्टात केस दाखल असूनही वर्ष होऊनही त्यावर सुनावणी होत नाही याचा अर्थ काय असा प्रश्न हि त्यांनी उपस्थित केला.
सिंचन घोटाळा संदर्भात सबळ पुरावे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्यस्थितीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊ नही काहीच उपयोग न झाल्याने माझ्याकडे असलेल्या कपाटभर पुराव्याच्या कागदपत्रांना अरबी समुद्रात बुडवण्याची नामुष्की आली आहे.

ML/KA/PGB
3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *