वैष्णोदेवी यात्रेसाठी IRCTC चे स्वस्त पॅकेज जाहीर

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरु झाला की हौशी पर्यटक आणि यात्रेकरुना पर्यटनाचे वेध लागतात. तुम्हाला जर माता वैष्णोदेवीच्या यात्रासाठी जायचे असेल तर IRCTC ने खास पॅकेज जाहीर केले आहे. तेही स्वस्त दरात. IRCTC चे वैष्णोदेवी पॅकेज तीन रात्री आणि चार दिवसांचे असणार आहे. विशेष बाब म्हणजे हे बजेट पॅकेज आहे. या पॅकेजसाठी तुम्हाला किमान 6795 रुपये भरावे लागणार आहेत.
- IRCTCने वैष्णोदेवीसाठी तीन रात्री आणि चार दिवसांचे पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला फक्त बुकींग करायची आहे. 10 डिसेंबरपासून रोज ट्रेन दिल्लीहून धावेल. रेल्वेतील सर्व प्रवास हा थर्ड एसी डब्यामधून होणार आहे.
- दररोज सुमारे 1700 रुपये भरून, तुम्ही AC कोचमध्ये प्रवास करू शकता. या पॅकेजचे बुकींग करायचे असल्यास तुम्ही आयआरसीटीसी टुरिझम साइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकता.
- माता वैष्णोदेवी पॅकेजचे रुमभाडे हे पुढील प्रमाणे असणार आहे. एका खोलीत तीन प्रवासी राहणार असतील तर 6,795 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागणार आहे. एका खोलीत दोघे प्रवासी राहणार असतील तर 7855 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. जर खोलीत एकच प्रवासी राहणार असेल तर त्याला 10395 रुपये भाडे द्यावे लागेल.
- जर तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षे वयोगटातील एका मुलं असतील आणि तुम्हाला त्याच्यासाठी हॉटेलमध्ये बेड हवा असेल तर एकूण खर्च प्रत्येक मुलासाठी 6160 रुपये द्यावा लागेल. तसेच बेड नको नसलेल्या प्रत्येक मुलासाठी 5145 रुपये खर्च येईल.
- ही ट्रेन नवी दिल्लीहून रोज रात्री 10.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता जम्मूला पोहोचेल. राजधानी दिल्लीतून हा प्रवास सुरु होणार आहे. हा प्रवास 3AC क्लासमध्ये असेल. येथून तुम्ही कारद्वारे कटरा येथे पोहोचाल. तेथे सरस्वती भवनात ट्रॅव्हल स्लिप घेऊ. त्यानंतर हॉटेलवर चेक इन करून नाश्ता दिला जाईल.
या विशेष पॅकेजबाबत अधिक जाणून घेण्यासाठी IRCTC च्या Website ला भेट द्या
IRCTC announced best packages for Vaishno Devi Yatra
SL/KA/SL
7 Dec. 2023