आईआरसीटीसी चालवणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

 आईआरसीटीसी चालवणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन

नागपूर, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकार द्वारे परिकल्पित “देखो अपना देश” आणि”एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेखाली देशातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी आयआरसीटीसीने ( रेल्वे कैटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड) भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरु केलेली असून आयआरसीटीसीच्या या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय पर्यटकांना भारताची सांस्कृतिक, धार्मिक, वारसा स्थळे पाहता यावी यासाठी छत्तीसगड आणि महाराष्ट्र मधील यात्रेकरुंसाठी आयआरसीटीसी द्वारे भारत गौरव पर्यटक ट्रेन द्वारे दक्षिण भारत शुभ यात्रा चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती irctc चे ग्रुप जनरल मॅनेजर तन्वीर हसन आणि irctc च्या जॉईंट जनरल मॅनेजर डॉ. क्रांती सावरकर यांनी आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. एक भारत श्रेष्ठ भारत योजने अंतर्गत आयआरसीटीसी द्वारे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन द्वारे दक्षिण भारत शुभ यात्रा २५ मे पासून बिलासपूर शहर पासून “दक्षिण भारत शुभ यात्रा” साठी रवाना होणार आहे. ही ट्रेन छत्तीसगड मधील बिलासपूर, भाटापारा, तिल्दा नोरा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव येथून भ्रमण करत महाराष्ट्रातील गोंदिया, तिरोरा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, बल्लारशहा या स्टेशन वरुन जाईल. या सर्व स्टेशन वरुन यात्री ट्रेन मधे बसू शकतील. 8 दिवस 7 रात्रीच्या या यात्रेत रामेश्वरम, मदुराई, तिरुपती, आणि श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग येथील मंदिरे आणि दर्शनीय स्थळाची भेट देण्यात येईल. या यात्रेसाठी प्रती व्यक्ती १५,५०० रुपये निश्चित केलेले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळणार असून स्लीपर क्लास, नॉन एसीची सुविधा मिळणार आहे .सदर ट्रेन ही अत्युच्च दर्जाची असून तिची बांधणी ही अत्याधुनिक असून सर्व कोच हे नवीन आरामदायी आणि अद्यावत आहेत. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही सर्वसमावेशक असून आरामदायक रेल्वे प्रवास, ऑन बोर्ड ऑफ बोर्ड भोजन, सडक परिवहन आणि आरामदायक बस मधून दर्शनीय स्थळाच्या भेटी समविष्ट आहेत. ऑन लाईन आणि काउंटर तिकीट देखील उपलब्ध असून काउंटर तिकीट काढणाऱ्यांसाठी 5 टक्के सूट देण्यात आलेली आहे. पर्यटकांचा यात्री विमा, संपूर्ण सुरक्षा, गाईड, भोजन, आरोग्य सेवा इत्यादी सुविधा मिळणार आहे. संपूर्ण प्रवास दरम्यान कोविड नियमांचे सुद्धा संपूर्ण पालन होणार आहे.इच्छुक पर्यटकांनी बुकिंग आणि अधिक माहिती साठी आयआरसीटीसी च्या www.irctctourism.com या संकेस्थळाला भेट द्यावी. तसेच बिलासपूर आणि रायपूर रेल्वे स्टेशनच्या आयआरसीटीसी कार्यालय यांना भेट द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.

ML/KA/PGB 6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *