इरई नदीचे पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कामाला वेग.

चंद्रपूर दि ३०:–चंद्रपूर शहाराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचे पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कामाला वेग आला असून हे काम ४५ दिवस चालणार आहे. इरई नदीचे खोलीकरण अभियान या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे आणि या टप्प्यात जवळजवळ सहा किलोमीटर नदी पात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे . या खोलीकरणामुळे इरई नदीची पाणी वहन क्षमता वाढण्यासोबतच चंद्रपूर शहराला बसणारा पुराचा फटका देखील कमी होणार आहे.