इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा…

चंद्रपूर दि ३:– निम्न वर्धा धरणातून रात्री पाणी सोडल्यामुळे चंद्रपूर शहरातील नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री रहमतनगर येथील सहा ते सात कुटुंबांना मनपाच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. रहमतनगर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मोहम्मदिया नगर आणि भिवापूर वॉर्ड येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मनपाच्या शाळांमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. इरई धरणाचे सर्व सात दरवाजे कालपासून उघडे असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.ML/ML/MS