ईरई नदीकाठी वाघीण मृतावस्थेत आढळली

 ईरई नदीकाठी वाघीण मृतावस्थेत आढळली

चंद्रपूर दि १२ :- चंद्रपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या पायली-भटाली बिटमधील दुर्गापूर क्षेत्रात, चिचोली गावाजवळ ईरई नदीकाठी नॉन-फॉरेस्ट (वनबाह्य) परिसरात सकाळच्या सुमारास एक तरुण वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे तसेच शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चंद्रपूरचे वनसंरक्षक राजन तलमले यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *