IPS रश्मी करंदीकरांच्या पतीचा जामीन अर्ज फेटाळला
सुमारे ७.४२ कोटी रुपयांच्या सरकारी जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या जामीन देण्यास नकार दिला. विशेष PMLA न्यायालयाने court वैद्यकीय जामीनावर निर्णय दिला.
चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता,मात्र न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले.गेल्या वर्षी मे महिन्यात २६३ कोटींच्या टीडीएस (TDS scam)घोटाळ्यातही ईडीने (Enforcement Directorate) चव्हाण यांना अटक केली होती. फेब्रुवारीत चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाने जामीन नाकारताना पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार होऊ शकतात असे म्हटले.”त्यांनी सादर केलेली वैद्यकीय कागदपत्रे आरोपीचे आजार दर्शवत असली तरी,तो इतका गंभीर नाही की त्याला जामिनावर मुक्त करावे असे आजार सरकारी रुग्णालये आणि तुरुंगामध्येही हाताळले जाऊ शकतात,” असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.