आयफोन १६ घेण्यासाठी मुंबईतील अॅपल स्टोअरबाहेर लोकांची झुंबड
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली. १३ सप्टेंबरपासून त्याच्या प्री बुकिंगला सुरूवात झाली. त्यानंतर २० सप्टेंबर म्हणजेच आजपासू आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. मुंबईच्या बीकेसीतील तसेच दिल्लीतल्या अॅपल स्टोअर बाहेर हा फोन घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड बघायला मिळते आहे.इतर भागातही अशाच प्रकारची गर्दी झाली आहे.
PGB/ML/PGB
20 Sep 2024