आषाढी वारीसाठी मुख्यमंत्र्यांना पूजेचे निमंत्रण

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज येथे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे सदस्य अँड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन तसेच पारंपरिक पद्धतीने सत्कारही करण्यात आला.
ML/KA/SL
14 June 2023