श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी ७ हजार पाहुण्यांना आमंत्रण

 श्रीराम मंदिर उद्घाटनासाठी ७ हजार पाहुण्यांना आमंत्रण

अयोध्या, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा आता अगदी काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने हा भव्य सोहळ्याच्या जय्यद तयारीची लगबग सुरु झाली आहे. २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातील आणि जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी उपस्थित राहणार आहेत. 3 हजार व्हीव्हीआयपींसह 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली (Virat Kohli), उद्योगपती मुकेश अंबानी , गौतम अदानी आणि रतन टाटा , बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ‘रामायण’ मध्ये भगवान राम भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अक्षय कुमार, आशा भोसले यांना देखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र कंगना रनौतला मात्र या यादीत स्थान मिळालेले नाही.

या सेलिब्रिटींशिवाय 1992 मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी हेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळ आणि तारखेबद्दल बोलताना ट्रस्टने सांगितले की, नवीन राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 ची असणार आहे. सुमारे ३ तास ​​हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

SL/KA/SL

7 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *