PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा

 PNG च्या IPO वर गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी कमावला मोठा नफा

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज लिस्ट झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो BSE वर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याची IPO किंमत 480 रुपये होती. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांनी लिस्टिंगवरच 350 रुपये नफा कमावला आहे. या IPO ला एकूण 59 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. PNG चे देशभरात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीची महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर्स आहेत. अमेरिकेतही PNG चे दुकान आहे.

PNG कंपनी IPO द्वारे मिळालेल्या पैशांचा वापर महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उघडणार आहे. याशिवाय यातून कर्जाची परतफेड देखील केली जाणार आहे. तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील तो वापरला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला होता. कंपनीचा करानंतरचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.

SL/ML/SL

17 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *