टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकीची सुसंधी

 टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकीची सुसंधी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : TATA Motors या देशातील आघाडीच्या कंपनीकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. टाटा कंपनीचा IPO तब्बल १९ वर्षांनी बाजारात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा मोटर्सची सह उत्पादन कंपनी आहे. मंगळवारी ३ ऑक्टोबरला टाटा टेक्नॉलॉजीने त्यांच्या IPO च्या DRHP साठी माहिती सादर केली आहे. या IPO साठी फायनान्शियल सिटी आणि बोफा सिक्युरिटीज यांची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीने मार्च २०२३ मध्ये IPO साठी सेबीकडे कागदपत्र सादर केली होती त्याला २७ जून रोजी SEBI कडून मंजूरी मिळाली.यापूर्वी टाटा कन्सल्टन्सीचा आयपीओ जुलै, २००४ मध्ये आला होता.

टाटा (Tata) टेक्नॉलॉजीने कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड- अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ०.५ टक्क्यांपर्यंत असेल. तसेच ज्या गुंतवणूकदारांकडे टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स आधीपासून असतील त्यांना १० टक्क्यांपर्यंत ऑफर देण्यात येईल. कंपनी गुंतवणूकदारांना 9.57 कोटी शेअर्स ऑफर (Offer) करणार आहे.

त्यामध्ये IPO प्रति शेअर २ रुपये असेल. IPO पूर्णपणे ऑफर-फर-सेल (OFS) असेल. OFS अंतर्गत टाटा मोटर्स, अल्फा टीसी आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड असेल. यामध्ये सध्या टाटा टेकमध्ये 74.69%, अल्फा टीसी होल्डिंग्ज 7.26% आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडकडे 3.63% हिस्सा आहे.

SL/KA/SL

5 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *