डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण

 डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण

मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात केल्या जाणाऱ्या तपासबाबत वारंवार असमाधान व्यक्त करून दाभोलकर कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी हा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रावर सध्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात आरोपींविरोधात खटला सुरू आहे.

SL/KA/SL

30 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *