अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू

 अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू

बारामती, दि. २८ : आज सकाळीच आलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करून गेली आहे. Learjet 45 या अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाने बारामतीमध्ये लँडींग करताना हवेत गिरट्या घेतल्या अन् क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला अन् उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, शांभवी पाठक यांच्यासह सर्वच 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटच्या सूत्रांनुसार, विमान बारामती विमानतळावर उतरण्यासाठी येत होते. पहिल्या प्रयत्नात पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही, त्यामुळे त्याने विमान पुन्हा उंचीवर नेले. अहवालानुसार, त्यावेळी दृश्यमानता सुमारे 2 हजार मीटर होती. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बारामतीच्या रनवे-11 वर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि कोसळले. त्यानंतर लगेचच त्याला आग लागली.
DGCA नुसार, सकाळी सुमारे 8:45 वाजता विमानाला शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. लँडिंगच्या वेळी पायलटला विमानावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि विमान धावपट्टीवर घसरले. जमिनीवर आदळताच त्याला आग लागली. एअरक्राफ्ट ट्रॅकर FlightRadar24 नुसार, विमान दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच ते कोसळले.

पायलट सुमित कपूर यांना विमान प्रवासाचा (Airplane) मोठा अनुभव होता, तर शांभवीलाही 1500 तासांच्या फ्लाईट सेवेचा अनुभव होता. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी विमान परत वर घेतले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टी ११ वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. विमान धावपट्टीच्या जवळ कोसळले आणि त्याला आग लागली. वैमानिकाने कोणतेही आपत्कालीन संकेत दिले नाहीत किंवा “मेडे” कॉलही केला नाही.

दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. तपास यंत्रणेचे एक पथक दिल्लीतील विमान संचालक व्हीएसआर व्हेंचर्सच्या कार्यालयात पोहोचले आहे. दुसरी टीम बारामतीला रवाना झाली आहे.

विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau) चे अधिकारी व्हीआरएस व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. कंपनीचे मालक आणि एआयबीचे अधिकारी तब्बल दीड तासांहून अधिक काळ कंपनीच्या आत उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून AAIB चे अधिकारी कंपनीबाहेर आले असून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेऊन सील करण्यात आली आहेत. या चौकशीसाठी तीनहून अधिक अधिकारी VRS व्हेंचर्स कंपनीत पोहोचले होते.

एडीएस-बी डेटाच्या प्राथमिक माहितीनुसार, विमानाच्या उड्डाण मार्गामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. उड्डाणाच्या दहा मिनिटांनंतर विमान 6 किलोमीटरपेक्षा अधिक उंचीवर होते आणि 1036 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करत होते. पण अचानक विमानाला नेमके काय झाले, हा तपासाचा विषय आहे. हे विमान साहिल मदान चालवत होते, ज्यांना 16 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. हे विमान VSR Ventures Pvt Ltd या खासगी विमानसेवा कंपनीचे होते. ही कंपनी भाड्याने विमान देण्यासोबतच एव्हिएशन कन्सल्टन्सीचेही काम करते.

लेअरजेट 45 (Learjet 45) या विमानाची आठ ते नऊ प्रवाशांना नेण्याची क्षमता होती. या लेअरजेट 45 विमानाकडून सकाळी 8 वाजून 34 मिनिटांनी Surveillance Signals पाठवणे बंद झाले होते, पण काही मिनिटांनंतर घिरट्या मारत विमानाकडून पुन्हा सिग्नल पाठवणे सुरू झाले. फ्लाइटरडार 24 नुसार, सुमारे 8:43 वाजता सिग्नल पूर्णपणे बंद झाले, ज्याद्वारे अपघाताची संभाव्य वेळ स्पष्ट होते.

विमानाकडून सिग्नल येणे बंद झाल्यानंतर केवळ तीन मिनिटांत अपघात झाला. ज्या ठिकाणी विमानाने एडीएस-बी सिग्नल पाठवणे बंद केलं, तेथून बारामती विमानतळापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर होते, याच ठिकाणी विमान उतरणार होते. पण विमान त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाही. एडीएस-बी एक्सचेंज या फ्लाइट ट्रॅकिंग सेवेवरून मिळालेल्या माहितीनुसार, विमान 1016 मीटर (एक किलोमीटरपेक्षा अधिक) उंचीवरून 237 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करत होते, त्याच वेळी विमानाचा सिग्नल ट्रॅकर्सशी संपर्क तुटला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *