वरुण सरदेसाई यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी चौकशी
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्थान स्काऊट गाईड संस्थेच्या माध्यमातून गरीब ,गरजू मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले आणि नंतर त्यांची कुठेही नेमणूक न मिळाल्याने त्यांची फसवणूक केली गेली याची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलं.
याबाबतचा मुद्दा योगेश सागर यांनी उपस्थित केला होता, वरुण सरदेसाई , रुपेश कदम आणि पंकज चौरागडे यांनी ही फसवणूक केली आहे, पैसे परत मागितल्यावर धमकी देण्यात येत आहे असंही सागर यांनी सांगितलं होतं.
इतर कामकाज …
हिराबेन दामोदर मोदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करणारा प्रस्ताव अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सभागृहात मांडला , हिराबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठवणी नार्वेकर यांनी यावेळी सांगितल्या , सभागृहाने दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली आणि प्रस्ताव मंजूर केला.
सरकारी अधिकाऱ्यांकडून आय पी सी कलम ३५३ चा होणारा गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल, त्या कलमात सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं, आशीष जयस्वाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
ML/KA/SL
30 Dec. 2022