मुंबईतील घोटाळ्यांची लोकायुक्त मार्फत चौकशी करा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक हे या सगळ्याला जबाबदार आहेत.बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार बसले आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा झालाय.१० रस्त्यांची काम देखील अद्याप सुरू झालेली नाहीत.गद्दार गॅंग सोडली तर सगळ्यांनी तक्रारी केल्या.मात्र कारवाई नाही झालेली आहे असे ठाकरे म्हणाले.
खडी घोटाळ्यात मुख्यमंत्री यांचे जवळचे कंत्राटदार आणि माणसं यात सामील आहेत.रस्ते फर्निचर १६० कोटींची काम २६३ कोटी रुपयांना दिली आहेत. यांचा उद्देश सरकार एका कॉन्ट्रॅक्टर ला फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे असे ठाकरे यांनी मुंबईच्या आमदारांसह राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.
पुणे जिल्ह्यातील नद्या मारण्याचं काम. टेकडी सपाट करण्याचं काम सुरू आहे.राज्यपालांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे .मुख्यमंत्री म्हणजे CM म्हणजे corrupt man ..
कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटी कुठे निघून जातात.कॉन्ट्रॅक्टर ना ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे.या आरोपासह पुरावा राज्यपालांकडे निवेदनासह आदित्य ठाकरे यांनी दिला असे म्हटले.Investigate scams in Mumbai through Lokayukta
या भ्रष्टाचाराची लोकायुक्त मार्फत चौकशी व्हावी मुंबई महापालिका आयुक्तां ची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.
ML/KA/PGB
10 May 2023