मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

 मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

job career

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुलाखतीसाठी सर्व कंपन्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात (कंपनी डोमेन नुसार) पण असे बरेच प्रश्न असतात जे हमखास विचारले जातात ते पुढील प्रमाणे –

१. तुमच्या बद्दल सांगा? (about yourself) – यात मुलाखत घेणाऱ्याला आत्मविश्वास आणि आपण ज्या भाषेत बोलतो ती किती सहज बोलतो हे अभिप्रेत असते. स्वतःला स्वतःबद्दल अमुक एक भाषेत ४ वाक्य तरी नीट बोलता येतात का?

२. आपले छंद कोणते? (Hobbies) – यावरून बरेच काही कळू शकते. जसे छंद खेळणे असेल तर मुलाखत देणारा हा शारिरीक दृष्ट्या सक्षम आहे (जर कंपनीत शारीरीक श्रम साठी मुलाखत देत असू तर), पुस्तक वाचणे किंवा काही नवीन शिकणे (नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रस आहे का) किंवा जनरल कामाचा व्यतिरिक्त आपण वेळ कसा व्यतीत करतो की हे अभिप्रेत असते.

३.घरी कोण कोण असतं? घरातील व्यक्ती काय करतात? – हा एकदम जनरल प्रश्न असतो आणि सहज विचारला जातो. यासोबतच आणखी एक प्रश्न असतो जर आपण घरापासून लांब राहत असू तर आपण इथे कोणाकडे राहतात.

एक जनरल प्रश्न असतो जरी आपण फॅमिली सोबत राहत असू किंवा स्वतंत्र रूम करून, ऑफिस ला कसे येणार. शिफ्ट मध्ये काम असेल आणि कंपनीची वाहतूक सोय नसेल तर हा प्रश्न हमखास विचारला जातो.

४. शैक्षणिक कारकीर्द? (Education) – शिक्षण कोणत्या कॉलेजमधून झाले, किती टक्के होते इत्यादी प्रश्न विचारले जातात. बायोडाटा (resume) मध्ये गॅप दिसला तर यावरही प्रश्न केले जाऊ शकतात. शैक्षणिक मध्ये आणखी खोलात विचारले जाऊ शकते जसे स्पेसलायझेसन कशात केले, आवडता विषय कोणता होता इत्यादी.

५. प्रोजेक्ट (Project) – शक्यतो फ्रेशर्सना (इंजिनिअरींग बद्दल सांगतोय बाकी ब्रँचबद्दल माहीत नाही) लास्ट इयर चा प्रोजेक्ट काय होता, किती लोकांची टीम होती, त्यात तुमचा रोल काय होता इत्यादी यावरून थोडक्यात आपली लायकी कळून जाते.

PGB/ML/PGB 26 July 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *