या राज्यात संध्याकाळी ७ नंतर मुलांसाठी इंटरनेट बंद
बंगळुरु, दि. २६ : कर्नाटक सरकारने ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. या धोरणानुसार मनोरंजनासाठी अभ्यास वगळता स्क्रीन टाइम फक्त एक तास मर्यादित ठेवण्यात येणार आहे. या धोरणानुसार सायंकाळी ७ वाजल्यानंतर इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे नियम आहेत. झोपण्यापूर्वी एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मोबाइलवर ‘Child Plan’ सुरू करण्यात येणार असून, त्यात फक्त ऑडिओ पर्याय असेल आणि वेळ संपल्यावर इंटरनेट आपोआप बंद होईल. वयानुसार योग्य डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचेही नियोजन आहे.
आरोग्य विभाग, कर्नाटक राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, NIMHANS आणि शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने हा मसुदा तयार झाला आहे. हे नियम फक्त नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या डिजिटल वर्तनावर लक्ष ठेवतील आणि मार्गदर्शन करतील. पालकांना घरी स्क्रीन टाइमची मर्यादा घालणे, मोबाइल-फ्री झोन तयार करणे आणि स्वतः उदाहरण देणे बंधनकारक असेल. यामुळे घरी आणि शाळेत दोन्हीकडे एकसमान नियम लागू होतील. विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.
SL/ML/SL