विमान प्रवासातही वापरता येणार इंटरनेट आणि फोन कॉलिंग सुविधा

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमानातसुद्धा प्रवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. भारतात एयर इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. विमानात वायफाय सुविधा देण्यासाठी सरकारने काही नियमांमध्ये बदल केला आहे. पूर्वी विमान प्रवास करतांना फोन आपोआप बंद होत असे. विमानात नेटवर्क नसल्याने फोन हा फ्लाइट मोडवर ठेवून बंद करावा लागत होता. मात्र आता प्रवासी पूर्णवेळ नेटवर्क वापरू शकणार आहेत.
फ्लाइट अँड सी कनेक्टिव्हिटी (सुधारणा) नियम, २०२४ मार्फत ही सेवा प्रवाशांना विमानात वापरता येणार आहे. ज्या विमानात इलेक्ट्रीक उपकरणे वापरण्याची परवानगी असेल तेथे इंटरनेट सुविधा वायफायमार्फत पुरवली जाईल. या सेवेचा पूर्ण कंट्रोल कॅप्टनकडे असेल. मात्र आवश्यकता नसेल तेव्हा वायफाय बंद सुद्धा करता येणार आहे.
सरकारने विमानात इंटरनेट वापरण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही नियम बदलल्याने आता विमान प्रवासादरम्यान आता मनसोक्त इंटरनेट वापरणे शक्य होणार आहे. विमान उड्डाणादरम्यान प्रवासी ३ हजार मीटर उंची गाठल्यानंतरच विमानात ही वायफाय सेवा वापरू शकणार आहे. जमिनीवरील दूरसंचार सुविधेत व्यत्यय येऊ नये यासाठी ही ऊंचीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
SL/ML/SL
9 Dec. 2024