भारत करणार १२५ देशांच्या International Solar Alliance चे नेतृत्व
नवी दिल्ली, दि. ८ : भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व १२५ देशांसह पुढे चालू ठेवणार असून, देशाची सौर ऊर्जा क्षमता २०२६ पर्यंत तब्बल १३२ गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) ही संस्था १२५ सदस्य देशांसह हवामान बदलावर मात करण्यासाठी सौर ऊर्जा उपाययोजना राबविण्याचे काम पुढेही सुरू ठेवणार आहे. अमेरिकेने या आघाडीतून माघार घेतल्यानंतरही भारताने स्पष्ट केले आहे की, उर्वरित देशांसह उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. गुरुग्राम येथे मुख्यालय असलेली ही आघाडी भारत आणि फ्रान्सने २०१५ मध्ये पॅरिसमधील COP21 परिषदेत संकल्पित केली होती. या आघाडीचे उद्दिष्ट सदस्य देशांना सौर ऊर्जा वाढविण्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि धोरणात्मक मदत करणे आहे
भारताची सौर ऊर्जा क्षमता
भारताची सौर ऊर्जा क्षमता गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत भारताची एकूण सौर ऊर्जा क्षमता ८२ गिगावॅट होती. पुढील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबविले जात असून, २०२६ पर्यंत ही क्षमता १३२ गिगावॅटपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये २०२५ मध्ये २२ गिगावॅट आणि २०२६ मध्ये २७.५ गिगावॅट नवीन क्षमता वाढविण्याचे लक्ष्य आहे.
SL/ML/SL