या ठिकाणी होईल जागतिक भरड धान्य परिषद
पुणे,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. या निमित्ताने पुणे येथे 16 डिसेंबर रोजी जागतिक भरड धान्य परिषद (World Millet Summit होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (MCCIA) द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाबार्ड (NABARD) आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालय देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.
16 डिसेंबर रोजी पुणे येथे सेनापती बापट मार्गावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, बजाज गॅलरी मध्ये सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळीत ही परिषद आयोजित केली जाईल. ‘नव्या भविष्यासाठी प्राचीन धान्य’ हे या परिषदेचे घोषवाक्य आहे. देशाच्या कृषी क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ आणि अभ्यासक या परिषदेला हजेरी लावणार आहेत. www.mcciapune.com या संकेतस्थळावर उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची नावे आणि परिषदेबाबत अन्य माहिती उपलब्ध आहे.
भरड धान्ये म्हणजे काय?
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई (भगर), राळा, भादली ही धान्ये भरडधान्ये म्हणून ओळखली जातात. गहू, तांदूळ, मका, बार्ली सोडून जी इतर तृणधान्ये आहेत, ती भरडधान्ये (Millet) नावाने ओळखली जातात. ही धान्ये सामान्यपणे आकाराने बारीक, गोलाकार, खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला ‘रीफाइन’ किंवा ‘प्रोसेस’ करण्याची गरजच नाही. असे म्हणतात, की फार फार पूर्वीपासून ही धान्ये वापरण्यात येत होती.
SL/KA/SL
5 Dec. 2022