राज्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई, पुण्यासारख्या शहरांना गणेशोत्सवानिमित्त विदेशी पर्यटक भेट देत असतात. त्यांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पर्यटनाला चालना देत पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख विदेशातील पर्यटकांना करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं शासनाकडून सांगितलं जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठई पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेचचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याच येईल. या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध भागातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसेच वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच गेटवे ऑफ इंडिया इथे श्री गणेशाच्या विविध रुपांच्या विशेष सांस्कृतिक केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात येईल. तर या भागामध्ये देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्राची पारंपारिक आदिवासी ‘वारली’ संस्कृतीचे दर्शन घडणवारी कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन देखील करण्यात येणार आहे.
SL/KA/SL
16 Sept. 2023