आयआयआयडीची इंटेरिअर डिझाईन परिषद ठाण्यात
ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटेरिअर डिझायनर म्हणजे अंतर्गत रचनाकाराला आतली बाजू बघता आली पाहिजे असे म्हटले जाते. कारण ही बाजू म्हणजेच वास्तूच्या मालकाचे हृदय आणि आत्मा यांचे बोल असतात.
ठाणे येथे भारतीय इंटेरिअर डिझायनर संस्थेची (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स, आयआयआयडी) एक विभागीय आकृती असून त्यांनी आकार इन्फोमीडिया (एआयएम) यांच्या सहकार्याने भारतीय अंतर्गत रचना संस्थेच्या “अंतर्गत रचनाकारांचा प्रदर्शनीय परिषद” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या परिषदेसोबतच वास्तुकला आणि बांधकाम विषयक साहित्याचे एक प्रदर्शन देखील भरवले जाणार असून इतकी महत्वाची परिषद ठाणे येथे प्रथमच होत आहे.
ही ठाणे शहराच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
परिषदेचा कार्यक्रम हायलँड पार्क मैदान, ढोकाळी, ठाणे (पश्चिम) येथे दिनांक २ जून ते ४ जून २०२३ या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपन्न होणार असून यावेळी प्रदर्शनासाठी कोणतेही प्रवेश मूल्य आकारले जाणार नाही!
या महत्वाच्या परिषदेसाठी भारतीय वास्तुविशारद संस्थेचे ठाणे केंद्र आणि क्रेडाई, आयपीए, एफएसएआय, आयजीबीसी तसेच आयएसएचआरएई या राष्ट्रीय पातळीवरील उद्योगांचाही सहभाग लाभला आहे.
या खास परिषदेमध्ये सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि आर्किटेक्ट हफीझ कॉन्ट्रॅक्टर, नितीन चंद्रकांत देसाई, आर्किटेक्ट हितेन सेठी, आर्किटेक्ट खोझेना चितळवाला, आर्किटेक्ट विवेक भोळे, आर्किटेक्ट विकास दिलावरी, आर्किटेक्ट हर्षद भाटिया, राहुल मेहता, एम व्ही देशमुख, डॉ. रविराज अहिरराव , संजीव करपे आणि इतर पॅरामेट्रिक अंतर्गत डिझाईन, वारसा वास्तूंमधील अंतर्गत रचनेचे संवर्धन, आयजीबीसी चे अनुपालन आणि त्याचे महत्व, अतिथी वास्तूंची अंतर्गत रचना, सिने जगत आणि अंतर्गत रचना, वास्तुशास्त्र आणि अंतर्गत रचनेत बांबूचे स्थान, वास्तू आणि अग्नी सुरक्षा अशा विविध विषयांवर आपले प्रस्तुतीकरण करणार आहेत.
महत्वपूर्ण परिषदेला ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि अर्थातच मुंबई येथील ५०० हून अधिक आर्किटेक्ट आणि अंतर्गत रचनाकार यांच्या बरोबरच देशाच्या विविध विभागातील रचनाकार व्यावसयिक उपस्थित राहणार आहेत. या परिषदे सोबतच वास्तुशास्त्र आणि बांधकाम साहित्य यांच्या बाबतीतील एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असून त्यात अंदाजे ५० उद्योग आपापले आधुनिक साहित्य आणि उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रस्तुत करणार आहेत. प्रदर्शनासाठी प्रवेश फी नाही!
प्रदर्शनाला भेट देणारांसाठी घराच्या संदर्भातील अत्याधुनिक साहित्य बघण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. यात फर्निचर, चिनीमातीच्या वस्तू, गृह सजावटीसाठी साहित्य, विविध प्रकारची प्रकाश उपकरणे, वास्तूसाठी लागणारी आधुनिक साधने, गाद्या, मनोरंजनाची साधने, विद्युत साधने, वातानुकूलन यंत्रे, खिडक्यांची रचना, टाईल्स, स्वच्छतागृहातील उपकरणे इत्यादी अनेक प्रकार असणार आहेत.
परिषदेमधील खास वेळ हा विद्यार्थ्यांच्या वास्तुशास्त्रावरील कार्यशाळा, अंतर्गत रचना, सुलेखन, वारली चित्रे आणि ओरिगामी यांच्यासाठी राखून ठेवला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्य आणि रचनेचे नवीन प्रकार याविषयी प्रत्यक्ष माहिती मिळू शकेल.
आयडीसीएस च्या या परिषदेचे लक्ष्य असेल ते बांधकाम क्षेत्राच्या संपूर्ण पर्यावरणाला तीन उपक्रमांच्या माध्यमातून जोडणे हे असेल. हे तीन उपक्रम म्हणजे अ) संपूर्ण भारतात रचनेच्या क्षेत्रातील सर्वांना एकत्र आणणे. ब) प्रदर्शनासाठी एक व्यासपीठ तयार करणे आणि क) अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचे प्रात्यक्षिक ज्यामध्ये नव्या पिढीचे रचनाकार आणि वास्तुविशारद विद्यार्थ्यांच्या साठी कार्यशाळा आयोजित करतील. या विविध क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे आज आयडीसीएस हे माहितीची देवाणघेवाण, संबंधितांचे जाळे तयार करणे आणि उत्पादनाची प्रदर्शने यासाठी एक सशक्त व्यासपीठ ठरले आहे.
आयोजकांच्या संदर्भात:
आपल्या सदस्यांमध्ये उत्तम व्यावसायिक व्यापार प्रक्रिया आणि नैतिकता निर्माण व्हावी या कल्पनेतून भारतीय अंतर्गत रचना संस्थेची (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स आयआयआयडी) स्थापना १९७२ साली केली गेली. अंतर्गत रचना या विषयाला आणि व्यवसायाला प्रकाशात आणणे आणि अशा देशातील आणि परदेशी इतर संस्थांशी माहितीची देवानण घेवाण करावी यासाठी देश आणि परदेशात संस्थेने नाव कमावले आहे. आज संस्थेचे १०,००० हून अधिक सदस्य असून ३३ ठिकाणी आपली केंद्रे आणि विभाग आहेत. अंतर्गत रचनाकारांच्या दृष्टीने ही संस्था आज खऱ्या अर्थाने करीत आहे.
संस्थेची ध्येये आणि उद्दिष्टे संपूर्ण रचनाकार बांधवांसाठी आणि समजासाठी काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आकार इन्फोमीडिया प्रायव्हेट लिमिटेड (एआयएम) ही संस्था एक B2B माध्यम, परिषद आणि व्यवसाय जत्रा या क्षेत्रातील संस्था असून ती २००६ मध्ये स्थापन झाली.
भारतीय अंतर्गत रचना संस्थेची (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स आयआयआयडी) साठी त्यांचे INSIGHT हे प्रकाशन एका दशकाहून अधिक काळ ही संस्था प्रकाशित करीत आहे. आणि त्यासोबतच भारतातील नळजोडणी या विषयावरील एकमेच असे प्लंबिंग टुडे याचे प्रकाशन ती गेली १५ वर्षे करीत आहेत. आकार इन्फोमीडिया प्रायव्हेट लिमिटेड (एआयएम) यांना देशातील विविध जागी परिषदा, प्रदर्शने आणि रोड शो आयोजित करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
ML/KA/SL
30 May 2023