या आजारांसाठी फक्त 59 रुपयांमध्ये विमा संरक्षण
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe आता आरोग्य विमा क्षेत्रातही पदार्पण करत आहे. यासाठी त्यांनी एक चांगली ऑफर देऊ केली आहे. PhonePe ने डेंग्यू, मलेरिया आणि इतर वेक्टर जनित रोगांसाठी विशेष आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांसाठी आता फक्त 59 रुपयांमध्ये विमा संरक्षण मिळणार आहे. . ही योजना एका वर्षासाठी 59 रुपयांपासून सुरू होते आणि 1 लाख रुपयांपर्यंत कव्हरेज देते. या योजनेंतर्गत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि स्वाइन फ्लूसह 10 हून अधिक आजारांवर उपचार, हॉस्पिटलायझेशन, निदान आणि आयसीयू खर्चाचा समावेश केला जाईल. प्लान हंगामी नसून वर्षभर वैध असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
PhonePe ने ही आराेग्य विमा याेजना देशातील टियर 2 आणि टियर 3 शहरात राहणाऱ्या लोकांसाठी आणली आहे. कॉर्पोरेट आरोग्य विम्याचे अतिरिक्त कव्हरेज म्हणून ही योजना कार्यरत व्यावसायिकांसाठी देखील फायदेशीर आहे. फाेनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे सीईओ विशाल गुप्ता यांनी सांगितले की, विमा परवडणारा आणि सुलभ बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. डिजिटल माध्यमातून सेवा नसलेल्या भागात आरोग्य कव्हरेज पोहोचवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.
SL/ML/SL
5 Dec. 2024