निवडक महिलांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान नव्हे.

 निवडक महिलांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान नव्हे.

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान नाही अशी टीका नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.Insulting select women is not insulting Maharashtra.

आज अमरावती येथे चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत,सप्ना पाटकर,नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले.

मंत्री संजय राठोड यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिली होती तरी त्यांच्या विरोधात लढा सुरूच राहील,न्यायालयात माझा लढा सुरू राहील…असे त्या म्हणाल्या.

संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी महिलांबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे असून महिलांनी काय घालावे काय घालू नये हा महिलांचा प्रश्न आहे. राज्यातील प्रतापगडा सह सर्व ऐतिहासिक गडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

ML/KA/PGB
10 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *