राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिक गतीने कामाच्या सूचना
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले.
आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात असेही ते म्हणाले.
ML/ML/SL
5 Dec. 2024