कंपनी असावी तर अशी! इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार भरपूर बोनस, आकडा वाचून म्हणाल, क्या बात है!
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे. इन्फोसिसकडून कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरच्या पगारासह ८५ टक्के परफॉर्मन्स बोनस दिला जाऊ शकतो. तशा आशयाचा ई-मेल यापूर्वीच परफॉर्मन्स बोनससाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. यामुळे कंपनीच्या डिलिव्हरी आणि सेल्स वर्टिकलमध्ये ज्युनिअर आणि मिड लेव्हल कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून इन्फोसिस कंपनीवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.