Infosys च्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
इन्फोसिस या लोकप्रिय टेक कंपनीचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोहित जोशी गेल्या २२ वर्षांपासून इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होते. जून २०२३ पर्यंतच ते इन्फोसिसमध्ये काम करणार आहेत.
इन्फोसिसमधून बाहेर पडल्यावर मोहित जोशी Tech Mahindra कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून काम पाहणार आहेत.
टेक महिंद्रा कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार मोहित जोशी यांना २० डिसेंबर २०२३ पासून कंपनीच्या संचालक मंडळावर घेतले जाईल. मोहित जोशी १९ डिसेंबर २०२३ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित जोशी यांनी इन्फोसिसच्या आधी ABN Ambro, ANZ Grindlays या कंपनीमध्ये काम केले आहे.
मोहित जोशी यांनी २००० पासून इन्फोसिसमध्ये काम करत आहेत. या आधी ते युरोपमधील आर्थिक व्यवसायांचे नेतृत्व करत होते. २००७ मध्ये मोहित याना इन्फोसिस मेक्सिकोचे सीईओ म्हणून घोषित करण्यात आले होते. मोहित यांनी लॅटिन अमेरिकेमध्ये इन्फोसिसचे पहिली उपकंपनी स्थापन केली आहे.
SL/KA/SL
11 March 2023