इन्फ्लुएन्सर डॅनी पंडीत नेहा कुलकर्णीसोबत विवाहबंधनात
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित नेहा कुलकर्णीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. बुधवारी त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. डॅनीची पत्नी नेहा ही व्हीएफएक्स आर्टिस्ट आहे. खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ असं कॅप्शन देत डॅनीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत.