Indigo Airlines च्या पॅरेंट कंपनीला तब्बल ९४४ कोटींचा दंड

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या Indigo ची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल ९४४.२० कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला आहे. आयकर विभागाने या संदर्भातील नोटीस कंपनीला पाठवली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला कंपनीने चुकीचं म्हटलं असून या आदेशाला कायदेशीर आव्हान देण्यात येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
एअरलाइन्स इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडने रविवारी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, त्यांना २०२१-२२ या कर निर्धारण वर्षासाठी आयकर विभागाने ९४४.२० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची नोटीस आली आहे. मात्र, आयकर विभागाच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असं एव्हिएशन लिमिटेडने स्पष्ट केलं आहे.
SL/ML/SL
30 March 2025