पाक सीमेजवळ तैनात होणार स्वदेशी तेजस विमाने

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर पहिली स्क्वाड्रन बिकानेरच्या हवाई तळावर तैनात होणार आहे. या दलाचे पहिले विमान याच महिन्यात तैनात होणार आहे. वर्षाखेरीस या तळावरील सर्व १८ विमाने ताफ्यात येतील. त्यात दोन प्रशिक्षणाची विमाने आहेत. आगामी पाच वर्षांत पश्चिमेकडील आघाडीवर तेजसचे आणखी दोन स्क्वाड्रन तैनात होतील. निवृत्त होणाऱ्या मिग २१ व मिग २७ ची जागा तेजस घेईल.
तेजसमुळे देशाची पश्चिमेकडील सीमेचे हवाई क्षेत्र सुरक्षेच्या दृष्टाने अधिक बळकट होईल.राजस्थानच्या नाल येथे तेजसची पहिली स्क्वाड्रन आल्यानंतर पश्चिम आघाडीवर तीन ते चार वर्षांनंतर आणखी हवाई दल तैनात केले जाणार आहेत. नालनंतर गुजरातच्या कच्छ भागात हवाई तळावर तेजसची दुसरे स्क्वाड्रन तैनातीची योजना आहे. हवाई दलास ८३ विमानांच्या माध्यमातून चार स्क्वाड्रनएवढी विमाने मिळतील.
तेजसचा सुरक्षा मापदंड (सेफ्टी फॅक्टर) अव्वल दर्जाचा आहे. आजमितीला तेजस विमानांनी, कुठल्याही प्रकारचा अपघात न होता, ६५०० तासांचे उड्डाण केले आहे. वैमानिक तेजसच्या जबरदस्त फ्लाइट कंट्रोल सिस्टीमच्या आधारे सर्व प्रकारच्या हवाईउड्डाण हालचाली करून विमानाला आकाशात नेऊ/ चालवू शकतो. भारतीय हवाई दलाची लढाऊ शक्ती कायम राखण्यात पुढील काळात स्वदेशी बनावटीच्या तेजसची महत्त्वाची भूमिका असणार आहे. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या जुन्या विमानांमुळे सध्यापेक्षा तुकड्या (स्क्वॉड्रन) कमी होऊ नयेत म्हणून तेजसला पाठबळ देण्याच्या दिशेने आश्वासक पावले पडत आहेत
SL/KA/SL
3 March 2024