दुबई एअर शोदरम्यान कोसळलं भारताचं तेजस विमान

 दुबई एअर शोदरम्यान कोसळलं भारताचं तेजस विमान

दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिक उड्डाण करत असलेले भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता एअर शोदरम्यान कोसळले. या भीषण दुर्घटनेत वैमानिकाला गंभीर दुखापत झाली व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वायुदलाने पुढे माहिती दिली की या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची (Court of Inquiry) समिती गठित करण्यात येत आहे. अपघाताची सर्व शक्यता तपासून संपूर्ण तपास अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.

तेजस हे भारतातच विकसित झालेले हलके लढाऊ विमान (LCA – Light Combat Aircraft) असून त्याच्या वेग, क्षमतांमुळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध आहे. हा अपघात भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

प्रात्यक्षिकादरम्यान हे विमान हवेत जटिल कलाकौशल्ये सादर करत असताना अचानक नियंत्रण सुटल्यासारखे दिसले आणि काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळले. अपघातानंतर परिसरात घनदाट काळा धूर पसरला व तो दूरवरूनही दिसत होता. या दुर्घटनेने प्रेक्षकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. विशेषतः एअर शो पाहण्यासाठी आलेल्या कुटुंबांनी आणि लहान मुलांसह उपस्थित असलेल्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *