७ सुवर्ण आणि २९ एकूण पदकांसह भारताची पॅरिस ऑलिंपिकमध्ये उत्तुंग कामगिरी
पॅरिस, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी कामगिरी भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये केली आहे. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण २९ पदके जिंकली असून यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 16 व्या स्थानवर मिळवले आहे. याआधी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात फारसे यश पडले नव्हते या पार्श्वभूमीवर भारताच्या पॅराऑलिम्पियन खेळाडूंची ही कामगिरी अगदी लक्षणीय आणि कौतुकास्पद ठरली आहे. भारताची ही सर्वकालीन सर्वोत्तम कामगिरी आहे, याआधी देशाने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 5 सुवर्णांसह 19 पदके जिंकली होती. खेळांचा समारोप समारंभ आज (८ सप्टेंबर) रात्री साडेअकरा वाजता होणार आहे.
ML/ML/SL
8 Sept 2024