पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक
पॅरिस, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी विजयी कामगिरी दिवसेंदिवस अधिक प्रभावी ठरत आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे. नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल3 स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलं आहे. या पदकामुळे भारताच्या पारड्यात नऊ पदक पडली आहेत. दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश झाला आहे. अवनी लेखरा, मोना अग्रवाल, प्रीति पाल, मनिष नरवाल, रुबीना फ्रान्सिस, निषाद कुमार, योगेश कथुनिया यांनी पदकं जिंकली आहेत. यात प्रीति पालने दोन पदकं जिंकली आहेत. या पदक संख्येसह भारत 22 व्या स्थानावर पोहोचला आहे.
पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नितेश कुमारचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी झाला. नितेश कुमारने त्याला 21-14, 18-21 आणि 23-21 ने पराभूत केलं. तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने गोल्ड जिंकलं होतं. यावेळी ही कामगिरी नितेश कुमारने केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नितेशने डेनियल बेथेलला कधीच पराभूत केलं नव्हतं.
नितेश आणि बेथेल यांच्यातील दुसऱ्या सेटपर्यंत अतितटीची लढत झाली. पहिला सेट नितेशने 21-14 ने सहज जिंकला. पण बेथेलने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं आणि 18-21 ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार लढत झाली. दोघांचा 16-16 गुण होते. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली केली. एका प्वॉइंटने वरचढ होण्यासाठी दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत लढले. काही वेळी ग्रेट ब्रिटेनचा डेनियल बेथेल पुढेही निघून गेला. पण नितेशने संयम सोडला नाही आणि शेवटपर्यंत सुवर्णपदकसाठी झुंज दिली. पॅरालिम्पिक स्पर्धेत नितेशचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
SL/ML/SL
2 Sept 2024