भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी, कार्लसन बुद्धीबळ विश्वविजेता

 भारताच्या प्रज्ञानानंदची झुंज अपयशी, कार्लसन बुद्धीबळ विश्वविजेता

बाकू (अझरबैजान), दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतविश्वविजेत्या ३२ वर्षीय कार्लसनला तगडे आव्हान देणाऱ्या भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदचा आज बुद्धीबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव झाला. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली.

टायब्रेकरमध्ये विजेता ठरवण्यासाठी २५-२५ मिनिटांचे दोन सामने खेळवण्यात येतात. यातील पहिला टाय ब्रेकर सामना कार्लसन याने जिंकला होता. दुसरा सामना प्रज्ञानंद याला जिंकाणं अनिवार्य होते. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या कार्लसन याचा आत्मविशावस वाढला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात आपला खेळ आणखी उंचावला, त्याला प्रज्ञानानंद याच्याकडून कडवी टक्कर मिळाली, पण दुसरा सामना अनिर्णित राहिला. अखेर कार्लसन बुद्धिबळाचा नवा विश्वकप विजेता झाला.

प्रज्ञानानंद याने पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. ३२ वर्षांच्या कार्लसन याने २००४ मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद याचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद याचा जन्म २००५ मधील आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई विषम पातळीवरील असल्याचे दिसतेय. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना रंगतदार झाला, पण अखेर अनुभवाने बाजी मारली.

SL/KA/SL

24 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *