भारताचं नवं सॅटेलाईट लॉंच, इलॉन मस्क यांच्या SpaceX चे सहाय्य
भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. ISRO चे हे सॅटेलाईट (उपग्रहाच्या) उद्योगपती इलॉन मस्कच्या SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बळकट होईल, असे सांगितले जात आहे. 4700 किलोग्रॅम वजनाच्या GSAT-N2 अथवा GSAT 20 या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल.