मत्स्य पाणबुडीतून भारताची मानवसहित सागरतळ मोहिम

 मत्स्य पाणबुडीतून भारताची मानवसहित सागरतळ मोहिम

विशाखापट्टणम्, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान-3 आणि मिशन आदित्य L1 च्या यशानंतर आता भारतीय शास्रज्ञ मानवसहित सबमर्सिबलमधुन महासागराच्या तळाचे संशोधन करण्यास सज्ज होत आहेत. यासाठी प्रोजेक्ट समुद्रयानची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत मागच्या दोन वर्षांपासून ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबलची बांधणी सुरु आहे. बंगालच्या उपसागरात 2024 च्या सुरुवातीला ‘मत्स्य’ सबमर्सिबलच्या चाचण्या सुरु होतील.

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ ‘मत्स्य’ 6000 ची बांधणी करत आहेत. त्यांनी डिझाइनची पाहणी केली. “खोल समुद्रात शोधकार्य हे मिशन समुद्रयानच उद्देश आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत आम्ही 500 मीटर खोलीवर पहिली चाचणी करणार आहोत” असं पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी ही माहिती दिली. मुख्य मिशनला 2026 मध्ये सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि फ्रान्स या देशांनाच सबमर्सिबल डेव्हल्प करता आली आहे.

6000 मीटर खोलीच प्रेशर घेण्याची या सबमर्सिबलची क्षमता आहे. सलग 12 ते 16 तास पाण्याखाली राहून ही सबमर्सिबल काम करु शकते. 96 तास पुरेल इतक्या ऑक्सिजनची व्यवस्था मस्त्यमध्ये असेल. ‘मत्स्य’ 6000 सबमर्सिबल समुद्राच्यावर असणाऱ्या जहाजाच्या संपर्कात राहील.

प्रोजेक्ट समुद्रयान ही भारताची मानवी मोहीम आहे. धातू आणि खनिजांचा शोध घेणं हा प्रोजेक्ट समुद्रयानचा उद्देश आहे. समुद्राच्या पोटात असलेल्या कोबाल्ट, मँगनीज आणि निकेल सारख्या खनिजांचा शोध घेण्यात येईल. कोबाल्ट, मँगनीज आणि निकेलशिवाय रासायनिक जैवविविधता, हायड्रोथर्मल वेंट आणि कमी तापमानातील मिथेनचा शोध घेण्यात येईल. या मिशनमध्ये भारत तीन जणांना ‘मत्स्य’ सबमर्सिबलमधून पाठवणार आहे.

SL/KA/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *