भारताच्या ज्युनियर हॉकी महिला संघाने जिंकला आशिया चषक

 भारताच्या ज्युनियर हॉकी महिला संघाने जिंकला आशिया चषक

मस्कत, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी ओमानमधील मस्कत येथे महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. गोलरक्षक निधीने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. अंतिम सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतर भारताने चीनचा शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव केला. या कामगिरीने भारतीय मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

नियोजित वेळेतही चीनच्या आक्रमणे रोखून धरताना निधीने सामना बरोबरीत सोडवला. जिनझुआंगने ३०व्या मिनिटाला चीनचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात ४१व्या मिनिटाला कनिका सिवचने भारताला बरोबरी साधून दिली. शूटआऊटमध्ये साक्षी राणाने भारताची पहिली संधी यशस्वी केली. त्यानंतर निधीने चीनचा पहिलाच प्रयत्न फोल ठरवला. मात्र, भारताच्या मुमताज खानचाही प्रयत्न अयशस्वी ठरला. हाओ गुओटिंगने चीनला बरोबरी साधून दिली. भारताच्या सुनेलिता टोप्पोने अखेरची संधी साधून भारताचा विजय साकार केला.पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून साक्षी राणा, इशिका आणि सुनीलिता यांनी गोल केले. गोलकीपर निधीने लिहांग वांग, जिंगी ली आणि डंडन झुओविरुद्ध तीन शानदार सेव्ह केले ज्यामुळे भारताने विजेतेपदाचे रक्षण केले.

हॉकी इंडियाने विजेतेपद जिंकल्याबद्दल प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *