देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरू

 देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. आज पासून एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, टीआयएफआरमधील प्राध्यापक एम.एन. वाहिया, एमयु एक्सलरेटर सेंटरच्या प्रमुख प्रा. वर्षा केळकर माने, डॉ. सिद्धार्थ कस्तुरीरंगन आणि डॉ. अभिजीत भोगले यांच्यासह चमुच्या उपस्थितीत करण्यात आली.

आत्तापर्यंत कार्बन डेटिंगसाठीचे नमुने हे परदेशात पाठविले जातात असत यासाठी सुमारे ६०० डॉलर्स खर्च येतो. मात्र आता ही अद्ययावत यंत्रणा आपल्या इथे उपलब्ध झाली आहे. पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे केंद्र सज्ज असून ५० हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परीणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या केंद्राकडे आहे. या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादीत न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व भारतीय शास्त्रज्ञाना आणि उद्योगांना होणार आहे.

SL/ML/SL

26 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *