भारताचा डी गुकेश ठरला सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता

 भारताचा डी गुकेश ठरला सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता

सिंगापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिंगापूर येथे आज झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय अवघे 18 वर्षे आहे. गुकेशने 14व्या गेममध्ये गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा 1-0 असा पराभव केला. आता स्कोअर 7.5-6.5 आहे. काल जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 13व्या गेममध्ये गुकेशला 68 चालीनंतर बरोबरी साधावी लागली.

बुद्धिबळाचा विश्वविजेता बनणारा गुकेश हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी विश्वनाथन आनंद 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेश बुद्धिबळ इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला, तो अवघ्या 18 वर्षांचा आहे. याआधी, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी FIDE उमेदवार बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.

गुकेश डीचे पूर्ण नाव डोमराजू गुकेश असून तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत आणि चेन्नईत ते होम चेस ट्यूटर आहेत. यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.

SL/ML/SL

12 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *