भारताचे बहुभाषिक AI मॉडेल Sarvam Vision लाँच

 भारताचे बहुभाषिक AI मॉडेल Sarvam Vision लाँच

बंगळूरू, दि. १० : येथील स्टार्टअप Sarvam AI ने नवीन बहुभाषिक व्हिजन-लँग्वेज मॉडेल Sarvam Vision सादर केले. हे मॉडेल भारताच्या “सॉव्हरिन AI” मालिकेचा भाग असून जागतिक बेंचमार्कवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. Sarvam Vision हे भारताचे पहिले मोठ्या प्रमाणावरचे बहुभाषिक व्हिजन मॉडेल मानले जात आहे. यामुळे दस्तऐवज बुद्धिमत्ता, स्थानिक भाषांतील माहिती प्रक्रिया, आणि व्यावसायिक अनुप्रयोग अधिक सुलभ होतील.

Sarvam AI चे संस्थापक विवेक राघवन आणि प्रत्युष कुमार यांनी २०२३ मध्ये कंपनीची स्थापना केली होती. या मॉडेलने काही चाचण्यांमध्ये Google Gemini आणि OpenAI ChatGPT पेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे हे नवीन एआय मॉडेल हे जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 सोबतच आघाडीच्या इतर एआय मॉडेलपेक्षा सरस ठरल्याचा दावा करण्यात येतो. सर्वम एआयच्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक सर्वम व्हिजन बहुभाषिक मॉडेल आधुनिक इंग्रजी दस्तऐवज प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. भारताचे बहुतांश ज्ञान हे विविध ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ, अभिलेखांमध्ये दडलेले आहे. हे प्रगत तंत्रज्ञान त्याचा गाभा समजून घेऊन त्या काळातील ज्ञान जगासमोर आणणार आहे.

सुरुवातीच्या चाचपणीत सर्वम व्हिजन या एआय मॉडेलने मराठी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, उर्दू, आसामी. हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगु आणि इतर अशा 22अधिकृत भारतीय भाषांमध्ये OCR कामगिरीत आघाडीच्या एआय मॉडेल्सपेक्षा चांगले परिणाम दाखवले आहेत. यामुळे दस्तावेजांची अचुकता आणि विश्वसनीयता समोर येणार आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार असल्याचे समोर आले आहे.

  • मुख्य वैशिष्ट्ये
  • ३ अब्ज पॅरामिटर्सचे व्हिजन-लँग्वेज मॉडेल
  • व्हिज्युअल अंडरस्टँडिंग टास्क्स:
  • इमेज कॅप्शनिंग
  • सीन टेक्स्ट रिकग्निशन
  • चार्ट इंटरप्रिटेशन
  • कॉम्प्लेक्स टेबल पार्सिंग
  • भारतीय भाषांसाठी सर्वोत्तम अचूकता – जागतिक मॉडेल्सना कठीण जाणारे स्थानिक भाषेतील दस्तऐवज व दृश्य समजून घेण्याची क्षमता.
  • मल्टिमोडल क्षमता – आवाज, मजकूर आणि आता दृश्य या तिन्ही माध्यमांत काम करण्याची ताकद.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वम व्हिजन या पहिल्या स्वदेशी एआय मॉडेलविषयी ट्विट केले आहे.त्यानुसार हे मॉडेल या क्षेत्रात ठोस परिणाम घडवून आणेल.देशाच्या एआय मिशनंतर्गत सर्वमने सादर केलेल्या प्रगत मॉडलचे तांत्रिक परिक्षण झाले आहे. हे मॉडेल कठोर परीक्षणावर खरं उतरलं आहे समीक्षकांनी सर्वमचे कौतुक केल्याचे ते म्हणाले. देशातील हुशार आणि तरुण अभियंते हे साहित्य विज्ञान, आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांमध्ये नवीन कल्पनांवर जिद्दीने काम करत आहेत. जागतिक स्तरावर हे मॉडेल क्रांतीकारक ठरल्याचा दावा त्यांनी केला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *