तब्बल 240 कोटींची लॉटरी, भारतीय तरुण झाला मालामाल
अबुधाबी, दि. ३० : UAE मध्ये राहणाऱ्या अनिल कुमार बोल्ला माधवराव बोल्ला या 29 वर्षीय भारतीय तरुणाने यांनी युएई लॉटरीचा पहिला 100 मिलियन दिरहमचा (Million Dirham) जॅकपॉट जिंकला आहे, ज्याचे भारतीय चलनात अंदाजित मूल्य सुमारे 240 कोटी रुपये आहे. युएई लॉटरीने सोमवारी व्हिडिओ जारी करून अनिल कुमार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. या मोठ्या रकमेचा वापर जबाबदारीने कसा करायचा यावर आता अनिल कुमार यांचे लक्ष आहे. ते म्हणाले, “मी फक्त ही रक्कम कशी गुंतवणूक करायची आणि योग्य मार्गाने खर्च करायची याचा विचार करत आहे.”
रिपोर्टनुसार, हा ऐतिहासिक ड्रॉ 23व्या लकी डे इव्हेंट अंतर्गत काढण्यात आला होता. विजयानंतर अनिल कुमार यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “हा एक भाग्यवान दिवस आहे जो आम्ही कधीही विसरू शकणार नाही.”
अनिल कुमार यांनी सांगितले की, त्यांनी आपला विजयी क्रमांक निवडण्यासाठी “ईझी पिक” (Easy Pick) पर्यायाचा वापर केला, ज्यामध्ये ‘डेज सेट’ मधून स्वयंचलित निवड झाली. मात्र, ‘महिन्यांच्या सेट’मधून त्यांनी 11 हा क्रमांक मुद्दाम निवडला, कारण तो त्यांच्या आईच्या वाढदिवसाचा महिना आहे. त्यांनी कोणतेही ‘जादू’ किंवा ‘गुपित’ वापरले नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी एकाच वेळी 12 तिकीटं खरेदी केली होती. लॉटरी जिंकल्याचे कळल्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता, “मी सोफ्यावर बसलो होतो आणि फक्त ‘हो, मी जिंकलो’ अशी भावना होती,” असे त्यांनी आठवणीने सांगितले.
SL/ML/SL