भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकला पहिला U19- T 20 विश्वचषक
केपटाऊन, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज येथे झालेल्या U19- T 20 विश्वचषकासाठीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लडचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत पहिल्या U19- T 20 विश्वचषकावर नावावर कोरून इतिहास रचला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाला अवघ्या 68 धावांमध्ये तंबुत पाठवले.
विजयासाठी चे 69 धावांचे लक्ष्य पार करताना भारताची कर्णधार शेफाली वर्मा ही तिसऱ्या षटकात 15 धावांवर बाद झाली.त्यानंतर लगेचच त्स्वेता सेहरावत बाद झाली. धावसंख्या २ बाद २० अशी झाली असताना सौम्या तिवारीने भारताचा डाव सावरला. यावेळी सौम्याला त्रिशाने चांगली साथ दिली. अखेरीस टीम इंडियाने ते सात विकेट्स गमावून 69 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि विश्वचषक जिंकून इतिहास रचला.
तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
SL/KA/SL
29 Jan. 2023