इस्रायलमध्ये लागू होणार भारतीय UPI
नवी दिल्ली, दि. २६ : UPI च्या वापरामुळे भारतीय आर्थिक व्यवहारांमध्ये सुटसुटीतपणा आणि तत्परता आल्यानंतर आता इतर देशही या पद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात दरम्यान भारताची UPI पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी सांगितले की, भारत लवकरच इस्रायलसोबत मुक्त व्यापार करार (FTA) करणार आहे. इस्रायलला भेट देणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू त्यांच्या द्विपक्षीय बैठकीनंतर अनेक आर्थिक, सुरक्षा आणि राजनैतिक करारांवर स्वाक्षरी करतील. ही माहिती इस्रायलच्या पंतप्रधानांच्या एक्स अकाउंटवर देण्यात आली आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, भारत आणि इस्रायलमध्ये ड्रोन खरेदी आणि संयुक्त उत्पादनासह अनेक प्रमुख संरक्षण करारांवर करार होण्याची अपेक्षा आहे. फोर्ब्स इंडियाच्या मते, २०२६ पर्यंत दोन्ही देशांमध्ये ८.६ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार शक्य आहे. या करारात अचूक-मार्गदर्शित
SL/ML/SL