३१ देशांच्या सफरीवर निघालेल्या भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगरचा मृत्यू

 ३१ देशांच्या सफरीवर निघालेल्या भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगरचा मृत्यू

मुंबई, दि. ४ : ‘फ्लाईंग खालसा’ नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर रघबीर सिंग भरौवाल यांचा पेरुमध्ये मृत्यू झाला आहे. बाईकवरुन ३१ देश फिरण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. पंजाबच्या भटिंडाचे मूळ रहिवासी असलेले रघबीर सिंग होते. पेरुतील त्रुजिलो शहराजवळ बाईकवरुन जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रघबीर सिंग यांनी त्यांच्या हार्ले डेव्हिडसनवरुन प्रवासाला नुकतीच सुरुवात केली होती. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता.

कॅनडाच्या सरेमध्ये राहणारे रघबीर सिंग यांना तीन मुलं आहेत. रघबीर सिंग पेशानं रेग्युलेटेड कॅनडियन इमिग्रेशन कन्सल्टंट होते. त्यांनी पंजाबमध्ये शिक्षण घेतलं होतं. सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात त्यांनी पदवी घेतली होती. यानंतर ऑन्टोरियोतील विंडसर शहरातून त्यांनी एमटेकचं शिक्षण पूर्ण केलं. मग त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व मिळवलं. जग प्रवास करण्याचं त्याचं स्वप्न होतं.त्यांनी आपल्या प्रवासाला ‘फ्लाईंग खालसा वर्ल्ड टूर’ असं नाव दिलं होतं. यासाठी त्यांनी ३१ देशांची यादी केली होती.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *